India-China Stand-Off in Ladakh: पूर्व लडाख मध्ये Pangong Lake च्या दक्षिण किनाऱ्यावर चीनी सैनिकांच्या चिथावणीखोर लष्करी हालचालींना भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर
Pangong lake, Ladakh (Photo credits: Unsplash, Sayan Nath)

भारतीय लष्कराकडून चीनला लडाख (Ladhakh) मध्ये पुन्हा चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान आज (31 ऑगस्ट) लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लडाख मध्ये चीनच्या पीएलए (PLA Activity )सैनिकांनी संघर्षाबाबत लष्करी आणि राजनैतिक चर्चे दरम्यान याआधी झालेल्या सहमतीचा भंग केला आहे. तसेच जैसे थे परिस्थितीत बदल घडवणाऱ्या चिथावणीखोर लष्करी हालचाली झाल्या आहेत. मात्र हा प्रकार लक्षात येताच भारतीय सैन्याने प्रतिबंध करत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली आणि जमिनीवरच्या तथ्यात बदल घडवण्याचा चीनचा हेतू विफल ठरवला आहे. सध्या या बाबत चुशूल ब्रिगेड कमांडर स्तरावर फ्लेग बैठक सुरु आहे. चर्चेद्वारे शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कर कटीबद्ध आहे त्याचबरोबर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठीही तितकेच ठाम आहे. अशी माहिती लष्कराच्या जन संपर्क अधिकारी ( सैन्यदल ) कर्नल अमन आनंद यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनच्या पीएलए सैनिकांनी, पूर्व लडाख मध्ये पॅन्गोंग त्सो तलावाच्या (Pangong Tso Lake) दक्षिण किनाऱ्यावरच्या जवळ हा प्रयत्न केला आहे. दरम्यान चीन काही तुकड्यांसह पुढे सरकरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वेळीच हा प्रकार भारतीय सैन्याच्या दलाला समजला आणि त्यांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

ANI Tweet

दरम्यान एप्रिल-मे महिन्यात भारत-चीन सीमेवर गलवान खोर्‍यात हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 3 जवान शहीद झाले होते तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त होते. तेव्हापासूनच सीमेवर ताण वाढला आहे. मात्र भारताने संयमी भूमिका घेत अधिकार्‍यांशी चर्चा करून, बोलून, सांमजस्याने यावर तोडगा काढण्याची भूमिका स्वीकारली आहे.