Piyush Goyal (Photo Credits: Wiki Commons)

ट्रेनमधून सफर करत असताना फोनला चुकून कधी नेटवर्क मिळतंय का याचा शोध घेण्याऐवजी आता येत्या काळात आपल्याला बिनधास्त फुल स्पीड वायफाय (WIFI)  सुविधेचा वापर करता येणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी याबाबत आज स्वीडन मध्ये ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना माहिती दिली. सद्य घडीला भारतातील 5150 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे, ही संख्या 2019 सालच्या अखेरीपर्यंत 6500 इतकी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे असेही गोयल यांनी सांगितले आहे. तर रेल्वे अंतर्गत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरु असून येत्या साडे चार वर्षात ही सुविधा सुरु करण्यात येईल.

प्राप्त माहितीनुसार, रेल्वेच्या अंतर्गत प्रवासात नेटवर्क उपल्बध करून देणे गरजेचे असले तरी यासाठी कठीण आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. सुरुवातीला रेल्वे रुळांच्या लगत नेटवर्क टॉवरची बांधणी इथपासून ते रेल्वेमध्ये नेटवर्क कॅच करणारे राऊटर्स लावणे हे काम करावे लागणार आहे. यासाठी काही काळ लागणार असून संबंधित कामासाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

हे ही वाचा-दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई लोकलमध्ये सुरु होणार वायफाय सेवा

ANI ट्विट

दरम्यान, मुंबई लोकल मध्ये सुद्धा इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे. तर येत्या काळात वायफाय सोबतच लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही सुद्धा लावणार असल्याने ही सर्व सुविधा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असणार आहे, असेही गोयल यांनी सांगितले आहे.