प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून रेल्वेची 1 करोड पेक्षा जास्त कमाई, आरटीआयच्या अहवालामधून खुलासा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रेल्वेने (Indian Railway) तिकिट बुकिंसह प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून भरपूर कमाई केली आहे. तर आरटीआयच्या (RTI) एका अहवालातून हा खुलासा करण्यात आला आहे. तर भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून 1,536.85 करोड रुपयांची कमाई केली आहे. मात्र आरटीआयच्या एका कार्यकर्त्याने रेल्वे तिकिट रद्द केल्यावर वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कात घट करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु अद्याप यावर कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

मध्यप्रदेशातील आरटीआय कार्यकर्ता चंद्रशेखर गौंड यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती दिली आहे. तर गौंड यांना रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे सूचना प्रणालीच्या केंद्रावर दाखल करण्यात आलेल्या अर्जांमधून ही माहिती मिळाली आहे. तसेच आरक्षित असलेल्या तिकिट रद्द केल्यामुळे 1,518.62 करोड रुपये रेल्वेने कमवले आहेत.

(रेल्वे तिकिटांवरील सबसिडी सोडण्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडून आवाहन)

तर प्रवाशांनी आरक्षित नसलेल्या तिकिटे रद्द केल्यामुळे रेल्वेला त्यामधून 18.23 करोड रुपये मिळाले आहेत. मात्र रेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर वसूल करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचे गौंड यांनी म्हटले आहे.