गॅस सिलेंडर प्रमाण आता रेल्वे तिकिटांवरील सबसि़डी सोडण्याचे आवाहन रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) करणार आहेत. त्याचसोबत भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकारकडून 'गिव्ह इट अप' योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढावे यासाठी रेल्वेकडून पंतप्रधान कार्यालयाला आराखडा पाठवण्यात आला आहे. तर सध्या रेल्वे तिकिटांमधून प्रवाशांच्या वाहतूकीच्या किंमतीच्या जवळजवळ 33 टक्के रक्कम जमा केली जाते. मात्र 47 टक्के रक्कम प्रवाशांना सबसिडी म्हणून दिली जाते. परंतु आता एलपीजी सिलेंडरवरील सबसिडीप्रमाणे रेल्वे तिकिटांवरील सबसिडीचा त्याग करावा असा पर्याय देण्यात आला आहे.
त्याचसोबत रेल्वे सबसिडी ही पंतप्रधान उज्ज्वल योजनेपेक्षा वेगळी आहे. मात्र सबसिडी सोडल्यास त्याचा वापर देशभरात उत्तम आणि आधुनिक रेल्वे व्यवस्था तयार करण्यासाठी केला जाईल असे म्हटले आहे. परंतु रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणे अनिवार्य नाही असे सुद्धा सांगण्यात आले आहे.