प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

तुम्ही रेल्वेने प्रवास (Railway Travel) करणार आहात मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ऐन दिवाळ (Diwali Festival) सणात भारतीय रेल्वे (Indian Railway) कडून तब्बल 169 गाड्या रद्द (Railway Cancelled) करण्यात आल्या आहेत. तरी दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये (Diwali Holidays) तुम्ही कुठे प्रवासाचं नियोजन केलं असल्यास रद्द झालेल्या गाड्यांमध्ये तुम्ही प्रवास करणार असल्याचा रेल्वे गाडीचा समावेश आहे का हे नक्की तपासून बघा. तांत्रिक अडचणी (Technical Error) आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे (Railway Track Repair) वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याने काही रेल्वे गाड्या रद्द भारतीय रेल्वे कडून रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे वेळापत्रक (Train Timetable) बदलवण्यात आले आहे. तर 25 ऑक्टोबर (October) म्हणजेचं आज रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 169 रेल्वे (Railway) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

तरी 169 पैकी एकूण 159 रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर उर्वरीत तीन गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असुन सात गाड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तरी तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर रद्द झालेल्या गाड्यांमध्ये तुमच्या गाडीचा समावेश तर नाही ना हे एकदा नक्की तपासून बघा. (हे ही वाचा:- Biryani in West Bengal: बिर्याणी खाल्ल्यास पुरुषांचे पौरुषत्व धोक्यात? बिर्याणी व्रिकेत्याचं शटर डाऊन)

 

तरी याबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत या संबंधीत सविस्तर माहिती मिळवू शकता.  https://enquiry.indianrail.gov.in/mnte  आणि https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/  लिंकवर क्लीक करत तुम्ही प्रवास करत असलेल्या ट्रेनसह विविध ट्रेनबाबत माहिती मिळवू शकता.