Indian Navy Day 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नौसेना दिनाच्या शुभेच्छा!
Indian Navy Day 2019| Photo Credits: FIle Photo

भारतीय नौसेना दिन (Indian Navy Day) हा 4 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. नौसेनेतील जवानांच्या शौर्याला सलाम करत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्यासह देशातील अनेक मान्यवर आणि सामान्यांनी आज सोशल मीडियावर नौसेनेच्या जवानांना सलाम करत भारतीयांना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी नेव्ही चीफ अ‍ॅडमायरल करमबीर सिंह (Navy Chief Admiral Karambir Singh)  यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट देत जवानांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान आज मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया वर देखील भारतीय नौसेनेकडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अजित पवार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, सुरेश हळवणकर यांसारख्या नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Indian Navy Day 2019: नौदल दिन 4 डिसेंबर दिवशी का साजरा केला जातो?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्वीट

व्यंकय्या नायडू ट्वीट

अजित पवार ट्वीट

देवेंद्र फडणवीस ट्वीट

ANI Tweet 

भारतीय नेव्हल बॅन्ड गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब परिसरात सादर केला जातो. दरवर्षी हा दिवस विशिष्ट थीमवर सेलिब्रेट केला जातो. यंदा Indian Navy - Silent, Strong and Swift या थीमावर संपूर्ण सेलिब्रेशन आधारित असेल. 1971 साली भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौसेनेने दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ हा दिवस खास असतो.