India Pak | Pixabay.com

भारताच्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर भारत-पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे. पाकिस्तान कडून शस्त्रसंधींचं उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली जात आहे. यामध्ये पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात 3 महिला आणि 5 मुलांसह 16 जणांचा जीव गेला आहे. यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. आज संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारताला पाकिस्तानकडून मोर्टार आणि तोफांचा मारा थांबवण्यासाठी प्रत्युत्तर द्यावे लागले. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफांचा वापर केला जात आहे. यामध्ये आता पाकिस्तान मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी Air Defence Radars आणि systems ला लक्ष्य केले. आहे. भारताने पाकिस्तानप्रमाणेच त्याच क्षेत्रात प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर येथील Air Defence system निष्क्रिय केली आहे.

सध्या पाकिस्तान कडून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे असेही संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे. नक्की वाचा: Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय हल्ल्यात किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती .

7 आणि 8 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने भारतात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक मिलिटरी टार्गेट्सना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. Integrated Counter UAS Grid आणि Air Defence systems हे लक्ष्य निष्क्रिय केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांना सिद्ध करत असल्याचं सांगण्यात आले आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारतीय हवाई दलाच्या S-400 Sudarshan Chakra हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने काल रात्री भारताच्या दिशेने येणाऱ्या लक्ष्यांवर डागले. या कारवाईत लक्ष्यांना यशस्वीरित्या हाणून पाडण्यातआले, असे अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी ANI ला सांगितल्याचे वृत्त आहे. याबाबत सरकार कडून अधिकृत पुष्टी होणं अद्याप बाकी आहे.