देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पावासाने हाहाकार (Heavy Rainfall) माजवला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरामुळे अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती असून काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने येत्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचे हवामान खात्याकडून (Weather Department) सांगण्यात आले आहे. तसंच या राज्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. (हेही वाचा - Uttarakhand Rains: भूस्खलनानंतर टेकडीच्या ढिगाऱ्यांमुळे बद्रीनाथ महामार्ग बंद)
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या राज्यांना पावसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व राज्यांमध्ये आजपासून 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांत पूर्व, ईशान्य आणि पूर्व मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मध्य भारतात, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ३१ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. १ आणि २ ऑगस्टला पश्चिम मध्य प्रदेश आणि 2 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 1 आणि 2 ऑगस्टला अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व मध्य प्रदेशात 1 आणि 2 ऑगस्टला आणि विदर्भात 1 ऑगस्टला पाऊस पडेल.