India-China Border Tension: भारत-चीन सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण मात्र कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जवान सज्ज- लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे
Army Chief Gen MM Naravane (Photo Credits: ANI)

"कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जवान पूर्णपणे सज्ज आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वोत्तम आहेत. ते केवळ सैन्यच नाही तर देशालाचीही मान अभिनानाने उंच करतील," असे लष्कर प्रमुख (Army Chief) जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) म्हणाले. भारत-चीन (India-China) मधील तणाव वाढल्याने लष्कर प्रमुख हे दोन दिवसीय लडाख दौऱ्यावर आहेत. सीमा भागीतील परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणे, हे लष्करप्रमुखांच्या या दौऱ्याचे प्रयोजन आहे.

"LAC जवळील परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेत आम्ही स्वतःच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत आहोत. त्यामुळे आमची सुरक्षितता आणि प्रामाणिकपणा यांचे रक्षण होईल," असे नरवणे म्हणाले.

ANI Tweet:

"लेहमध्ये पोहचल्यानंतर मी वेगवेगळ्या भागांना भेट दिली. मी अधिकारी, जेसीओज यांच्याशी चर्चा केली. तयारीचा आढावा घेतला. त्यावरुन जवानांचे मनोबल उत्तम असून ते कोणत्याही आव्हानाला समोरे जाण्यास सज्ज आहेत," असे नरवणे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

गेल्या 2-3 महिन्यांपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. आम्ही चीनसोबत लष्करी पातळीवर संवाद साधत होतो. हा संवाद चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील. या चर्चेतून आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.