चीन सैनिकांनी (PLA Army) भारत आणि चीन लष्करी आणि राजनैतिक चर्चेत झालेल्या सहमतीचा भंग करत पूर्व लडाख मध्ये Pangong Lake च्या दक्षिण किनाऱ्यावर पुन्हा आपले सैन्य तैनात केल्याने महिन्याभरापुर्वीची तणावपुर्ण परिस्थीती पुन्हा उद्भवली आहे. मात्र यात चीनचा नव्हे तर भारतीय सैन्याचा दोष असल्याचे म्हणत भारतातील चीन दुतावासाने (China Embassy) एक निवेदन जारी केले आहे. चीनच्या दुतावासाच्या साईटवरुन सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना भारतीय सैन्याने पांगोंग त्सोच्या दक्षिणेकडील भागात पुन्हा LAC बेकायदेशीरपणे ओलांंडल्याचे म्हणण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, चीनने भारताला वारंवार निवेदन करुनही भारतीय सैन्याकडुनच पुर्व आश्वासने पाळली जात नसल्याचे सुद्धा या निवेदनात लिहिलेले आहे.
सध्याच्या माहितीनुसार, 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनच्या पीएलए सैनिकांनी, पूर्व लडाख मध्ये पॅन्गोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या जवळ काही तुकड्यांसह पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र वेळीच हा प्रकार भारतीय सैन्याच्या दलाला समजला आणि त्यांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला असे भारताकडुन सांंगण्यात आले आहे तर निवेदनात चीन कडुन म्हंंटल्याप्रमाणे, 31 ऑगस्ट रोजी भारतीय सैनिकांंनीच या भागात सैन्य तैनात करुन तणाव वाढवला आहे.भारताचे हे वर्तन तणाव कमी करण्यासाठी यापुर्वी दोन्ही देशाकडुन करण्यात आलेल्या प्रयत्नांंच्या विरुद्ध आहेत अशा शब्दात चीनच्या दुतावासाने ताशेरे ओढले आहेत.
पहा चीन च्या दुतावासाचे निवेदन
Chinese Embassy in India releases statement on India-China border situation; says, "Indian troops illegally trespassed LAC again at southern bank of Pangong Tso."
It further reads, "China made solemn representations to India, urged them to control & restrain frontline troops." pic.twitter.com/mCAaLXkjsd
— ANI (@ANI) September 1, 2020
दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज उच्च अधिकार्यांसह भारत-चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. संरक्षणमंत्री आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावण्याची शक्यता असल्याने ANI ने सुत्रांंच्या हवाल्याने म्हंंटले आहे. परराष्ट्र मंंत्री एस. जयशंकर यांंनी हा विषय दोन्ही देश व उर्वरित जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यामुळे दोन्ही देशांंचे सहकार्य अपेक्षित आहे असे म्हंंटले होते.