प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

India Allows Export Of Onion:  केंद्र सरकारने गेल्या 2-3 दिवसांपूर्वीच भारतातील कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. तर अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असून कापणीला सुद्धा उशीर झाल्याने बांग्लादेशात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. पण सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात संताप केंद्र सरकारच्या विरोधात व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच केंद्र सरकारने तत्काळ ही निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारतातील बंदरांवर पडून असलेला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तर बांगलादेशासह अन्य ठिकाणी सुद्धा आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

तर जगभरात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही शेतकऱ्याकडून कांदाचे पिक घेण्यात आले. पण त्याला उत्तम भाव मिळत नव्हता. मात्र शेतकऱ्याने चार पैसे अधिक मिळतील अशी आशा कधीच सोडली नव्हती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी कांद्याच्या उत्पादकांनी रस्त्यावरुन उतरुन मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने सुद्धा केल्याचे दिसून आले. याचे प्रतिसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटल्याचे दिसून आले. लालसगाव येथील कांदा मार्केट ही बंद ठेवत आंदोलन केल्याचे दिसून आले होते.(महाराष्ट्र: केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीवर शेतकरी आक्रमक, सरकारने फेरविचार करावा अशी शरद पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी)

दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर राजकर्त्ये देखील आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक असल्याचे भाजप नेते उद्यनराजे भोसले यांनी म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. तसेच यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता.