आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day). यंदा भारताचा 75 वा स्वांतत्र्य दिन आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधित करतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींचे हे सलग 8 वे भाषण असेल. झेंडावंदनानंतर सकाळी 7.30 च्या सुमारास मोदी भाषणाला सुरुवात करतील. मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी (DD) वर पाहता येईल. याशिवाय पीआयबी (PIB) देखील आपल्या युट्युब आणि ट्विटर हँडलद्वारे मोदींच्या भाषणाचे स्ट्रिमिंग करतील. याशिवाय पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत युट्युब चॅनल आणि ट्विटर हँडलवर देखील मोदींचे भाषण पाहता येईल.
मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या एमआय 17 1B हेलिकॉप्टर्स द्वारे लाल किल्ल्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येईल. यासोबतच कोरोना योद्धांना सलामी देण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा सह 32 विविध पदक विजेत्या खेळाडूंना निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच स्पोर्ट्स फेडरेशन आणि स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या 240 ऑलिंपिक खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांना देखील या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण येथे पहा:
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "फाळणीच्या वेदना कधीच विसता येणार नाहीत. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या सर्वांच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळण्यात यावा."