Dry Day on 15th August 2020: भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या महाराष्ट्रात ड्राय डे!
Representational Image (Photo Credits: Pixabay)

उद्या 15 ऑगस्ट भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day). स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ड्राय डे (Dry Day) पाळला जातो. त्यामुळे उद्या विदेशी मद्य, देशी दारू कुठेही मिळणार नाही. दरवर्षी ड्राय डे निमित्त बार, दारुची दुकाने बंद असतात. मात्र यंदा कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बार, मद्याची दुकाने अद्याप खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ मद्य, दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र मद्याची डिलिव्हरी देखील होणार नाही.

भारत सरकारने काही धार्मिक आणि राष्ट्रीय सणांदिवशी ड्राय डे घोषित केला आहे. त्यामुळे ड्राय डे च्या दिवशी परिसरातील सरकारी परवाना असणाऱ्या दुकानात दारू विक्री बंद ठेवण्यात येते. तसंच या दिवशी अवैध पद्धतीने दारु विक्री करणे, मागवणे महागात पडू शकते. तसंच परवनाविना दुकानातून दारू खरेदी करणे आरोग्यासाठी धोकादायक धरु शकते. (Dry Days In Mumbai 2020: या वर्षातील ड्राय डे ची संपूर्ण यादी येथ पहा)

ऑगस्ट महिन्यात जन्माष्टमी निमित्त 12 ऑगस्ट रोजी ड्राय डे होता. उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ड्राय डे असणार आहे. तर त्यानंतर 21 ऑगस्टला गणेश चतुर्थी आणि 29 ऑगस्टला मोहरम निमित्त ड्राय डे पाळण्यात येईल. मद्यप्रेमींसाठी खुशखबर म्हणजे सप्टेंबर महिन्यात केवळ एकच दिवस ड्राय डे असणार आहे. तर ऑक्टोबरमध्ये 4 आणि नोव्हेंबर मध्ये 2 ड्राय डे असतील.

यंदा पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन एखाद्या थीमवर साजरा केला जाणार आहे. कोरोना व्हायरस संकटात संधी शोधत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे. यासाठी त्यांनी स्वदेशीचा नारा दिला जात आहे. तसंच कोविड-19 संकटामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन व्हर्च्युअल माध्यमातून साजरा करण्याकडे भर दिला जात आहे.