भारतात 12 तासांत कोरोना व्हायरसच्या 240 रुग्णांची नोंद; देशातील संक्रमणाची एकूण संख्या 1637 वर
Coronavirus Pandemic (Photo Credits: IANS)

गेल्या तीन दिवसांत भारतात कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवघ्या 12 तासांत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये 240 नी वाढ झाली आहे. देशात आता संक्रमित रूग्णांची संख्या 1637 वर पोहोचली आहे. या साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 133 लोक बरे झाले आहेत ही एक दिलासाची बाब आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) बुधवारी ही माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन येथे, तबलीगी जमातीच्या एका कार्यक्रमात सामील झालेल्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. या कार्यक्रमांत 19 राज्यातील 1500 पेक्षा अधिक लोक सामील झाले होते. सध्या यातील 8 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर भारतातील कोरोनाची भीती अजूनच वाढली आहे. आंध्र प्रदेशच्या सीएम कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन मरकझ, दिल्ली येथील कार्यक्रमात भाग घेऊन परत आलेल्या 43 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने निजामुद्दीन मरकझ याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Lockdown काळात लोकांना घरी राहण्यासाठी स्वतः Coronavirus, यमराज आणि चित्रगुप्त करतायत आवाहन; जाणून घ्या आंध्रप्रदेश पोलिसांची हटके Trick)

काल रात्री उशिरापर्यंत या इमारतीमधून लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर आता इमारत व परिसर सील केला असून स्वच्छतेचे काम सुरु आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे, मात्र तरी रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या महाराष्ट्र सर्वाधिक, 320 रुग्ण आहेत.