लोकसभा निवडणूकीपुर्वी (Loksabha Election) काँग्रेस पक्षाला (Congress Party) मोठा दिलासा मिळाला आहे. कर सवलत नाकारत कर वसुली आणि दंडापोटी काँग्रेसला इन्कम टॅक्स विभागानं (Income Tax Department) तब्बल 1700 कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली होती. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच इन्कम टॅक्स विभागानं हे पाऊल उचलल्यानं काँग्रेसनं थेट कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर "काँग्रेसला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही" असं स्पष्टीकरण इन्कम टॅक्स विभागानं कोर्टात दिलं आहे. (हेही वाचा - Congress Tax Notice: काँग्रेसला आयकर विभागाची नवी नोटीस, भरावा लागणार 3500 कोटींचा कर)
पाहा पोस्ट -
Income Tax department tells Supreme Court that it will not take any coercive step to recover Rs 1700 crores from Congress party during the Lok Sabha elections and urges the court to post the matter for hearing in June.
I-T department says that it does not want to create problems…
— ANI (@ANI) April 1, 2024
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाकडून 1,700 कोटी रुपये वसूल करण्यासाठी कोणतीही जबरदस्तीची पाऊलं उचलणार नाही आणि त्याचबरोबर हे प्रकरण जूनमध्ये सुनावणीसाठी घेण्याची विनंतीही यावेळी विभागाकडून करण्यात आली. आयटी विभागाचे म्हणणं आहे की, ते निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षासाठी समस्या निर्माण करू इच्छित नाहीत.
दरम्यान आयकर विभागाकडून काँग्रेसला नवीन नोटिस मिळाली आहे. ज्यामध्ये 2014-15 ते 2016-17 या वर्षांसाठी 1,745 कोटींच्या कराची मागणी करण्यात आली आहे. या नव्या नोटिशीसह, आयकर विभागाने काँग्रेसकडे एकूण 3,567 कोटींच्या कराची मागणी केली आहे. ही नवीन कराची नोटिस 2014-15 (663 कोटी रुपये), 2015-16 (सुमारे 664 कोटी रुपये) आणि 2016-17 (सुमारे 417 कोटी रुपये ) याच्याशी संबंधित आहे.