विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच आज कोलकाताच्या ब्रिगेड मैदानात भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उपस्थिती दर्शवून या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असे चित्र दिसू लागले आहे. यातच आज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला. असे असले तरीही भाजप पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा पुढे जाऊ शकत नाही अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.
"अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजपाची सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पूर्णपणे असं वातावरण निर्माण केलं जात आहे की, बंगालमध्ये भाजपाचं सरकार येणार आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की, बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळू शकत नाही. आसामध्ये देखील जे भाजपाचं सरकार आहे, निकालानंतर 50 ची संख्या राहील." असे नवाब मलिक म्हणाले.हेदेखील वाचा- ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
बंगाल मे २ डिजिटस से आगे भाजपा नहीं जा सकती। आसाम में भी सरकार जो भाजपा की है नतिजो के बाद ५० का आकडा रहेगा।(२/२)
- कैबिनेट मंत्री ना.@nawabmalikncp साहेब
— NCP Mumbai (@MumbaiNCP) March 7, 2021
"अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही. आसामध्ये देखील भाजपा सत्तेतून बाहेर होणार आहे" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकासाघाडी सरकारमधील कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान "बंगालच्या जनतेने बंगालमध्ये परिवर्तन घडून येईल या आशेने ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला" अशी घणाघाती टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली.