विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आज पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोलकातामधील ब्रिगेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या रॅलीत ते बोलत होते. बंगालच्या जनतेने बंगालमध्ये परिवर्तन घडून येईल या आशेने ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला अशी घणाघाती टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली.
"बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला," अशी टिका पंतप्रधान मोदींनी केली.हेदेखील वाचा- Actor Mithun Chakraborty Joins BJP: अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश
#WATCH हर घर जल पहुंचाने के लिए केंद्र सरकार जो पैसे भेज रही है, उसका बहुत बड़ा हिस्सा आज तक यहां की सरकार खर्च ही नहीं कर पाई है। आज इस ब्रिगेड ग्राउंड से पूरे बंगाल के लोगों से पूछता हूं- क्या TMC सरकार बंगाल के गरीबों, यहां की महिलाओं, बच्चों की गुनेहगार है कि नहीं? : PM pic.twitter.com/QJLvZAoMu0
— ANI_HindiNews (@AHindinews) March 7, 2021
"बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला" असेही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर 'प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने जे पैसे पाठवले त्याचा मोठा हिस्सा आजपर्यंत येथील सरकार अजूनपर्यंत खर्च करु शकली नाही. आज इथल्या ब्रिगेड ग्राउंडवरुन मी पूर्ण बंगालच्या लोकांना विचारू इच्छितो, 'TMC सरकार बंगालच्या गरीब जनतेचे, महिलांचे, लहान मुलांचे, गुन्हेगार आहे की नाही?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
"या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही 24 तास काम करू. कष्ट करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.