Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

भारताता कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हाहाकार माजविला असून दिवसागणिक वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता देशातील भयाण परिस्थिती समोर येत आहे. भारतात कोरोना संक्रमितांची संख्या 53 लाखांच्या पार (COVID-19 Cases in India) गेली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 53,08,015 इतका झाला आहे. सध्या भारतात 10,13,964 रुग्णांवर उपचार (COVID-19 Active Cases) सुरू आहेत. याच धर्तीवर भारतात मागील 24 तासांत 12 लाखांहून अधिक कोविड चाचण्या (COVID-19 Test) घेण्यात आल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण 6.37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून जनतेला वेळोवेळी सोशल डिस्ंटसिंग आणि अन्य नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) लेटेस्ट अपडेटनुसार, देशात कोरोना संसर्गामुळे एकूण 85,619 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून जगात भारत प्रथमस्थानी आहे. कोरोना रिकव्हरीच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. World COVID-19 Cases Update: जगभरात कोरोनाचा हाहाकार! कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 कोटींच्या पार, तर मृतांचा आकडा 9 लाखांच्या पलीकडे

जगातील एकूण रिकव्हरीत भारताचे 19% योगदान आहे. तर भारतात एकूण 79.28% रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 42 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यू दरातही घट होत आहे. सध्याच्या मृत्यू दर 1.61% इतका आहे.