PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

भारत-चीन सीमावाद पुन्हा एकदा उफाळला असताना काल (16 जून) लडाख (Ladakh) प्रांतातील गलवान व्हॅली (Galwan Valley) भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले असून चीनचे 43 जवान जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बेठकीत सर्व पक्षांचे अध्यक्ष सहभागी होतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून (PM's Office) देण्यात आली आहे. तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडेल. (India-China Clash: चीन मुद्द्यावर मोदींचे मौन, राहुल गांधी यांचे सवाल, पंतप्रधान बोलत का नाहीत? भारताचे जवान मारण्याची चीनची हिम्मतच कशी झाली?)

6 जून रोजी भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वातावरण शांत होईल असे वाटत असताना काल झालेल्या झटापटीनंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान शहीद झालेल्या जवानांबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ANI Tweet:

आज सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक व्हिडिओ मेसेज जारी केला होता. त्यात राहुल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? कुठे लपले आहात? तुम्ही समोर या संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. जे काही सत्य असेल ते देशाला सांगा. घाबरु नका." तसंच शिवसेना खासदास संजय राऊत यांनी देखील यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.