लज्जास्पद! बारावीच्या विद्यार्थ्यांचा वर्गातील Kissing Video व्हायरल; शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाकडून मागितला खुलासा (पहा व्हिडीओ)
Students kissing. | Representative Image. (Photo Credit: Twitter)

आजकाल मोबाईल आणि इन्टरनेटमुळे अनेक गोष्टी आपल्या हातात आल्या आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे तो सध्याच्या तरुण पिढीवर. सोशल मिडियाचा वाढता वापर, पालकांचे आपल्या मुलांवर योग्य लक्ष नसणे अशा अनेक गोष्टींमुळे आजकालच्या मुलांना आपण नक्की काय करत आहोत याचे भानच राहत नाही. गुजरातच्या पंचमहाल (Panchmahal) जिल्ह्यातील मोरवा हडफच्या (Morva Hadaf), केएस हायस्कूलमधील एका वर्गात दोन विद्यार्थ्यांनी एकमेकांना केलेल्या चुंबनाचा व्हिडीओ (Kissing Video) सध्या व्हायरल होत आहे. यामुळे शाळेसह वर्गातील इतर मुलांची मान शरमेने खाली गेली आहे.

पहा व्हिडिओ -

याबाबत मुख्याध्यापकांनी स्टाफला नोटीस देऊन या गोष्टीचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. क्लास रूममध्ये किस करत असलेल्या विद्यार्थ्याचा हा व्हायरल व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. इतर विद्यार्थीही या दोघांची ही परिस्थिती पाहत आहेत. आता प्रश्न पडला आहे की, मुले ही कृती करीत असताना शिक्षक नेमके कुठे होते? ही दोन्ही मुले इयता बारावीमध्ये शिकत आहे. (हेही वाचा: धक्कादायक: 10 वर्षांचा बॉयफ्रेंड, 13 वर्षांची गर्लफ्रेंड; नकळत घडलेल्या Sex नंतर मुलगी गरोदर)

या घटनेसंदर्भात शाळेचे प्राचार्य अश्विन पटेल म्हणाले की, 'आमच्या शाळेत प्रथमच अशी घटना घडली आहे. ही घटना 23 जानेवारी 2020 रोजी इयत्ता 12 वीच्या वर्गात सुट्टी दरम्यान घडली. मी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन केला. पण त्याचे आईवडील आले नाहीत. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. याबाबत स्टाफला नोटीस बजावून त्याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.' दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कर्मचारी व पर्यवेक्षकाचे म्हणणे लक्षात घेऊन कारवाई करण्यास सुरवात केली आहे.