धक्कादायक: 10 वर्षांचा बॉयफ्रेंड, 13 वर्षांची गर्लफ्रेंड; नकळत घडलेल्या Sex नंतर मुलगी गरोदर
डारीया आणि इवान (संग्रहित संपादित प्रतिमा)

लहान वयात मुली गरोदर (Pregnant) होण्याविषयी आपण बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. मुलीवर बलात्कार झाल्याने बर्‍याचदा असे घडते. परंतु जेव्हा तिला याबद्दल समजते तेव्हा उशीर झालेला असतो. आता असे एक प्रकरण समोर आले आहे, जिथे लहान वयात मुलगी गरोदर आहे, मात्र होणाऱ्या मुलाचे वडील हा अवघ्या 10 वर्षांचा मुलगा आहे. हे सत्य पचायला थोडे अवघड आहे मात्र हे खरे आहे. या मुलीने स्वतःही ही माहिती दिली आहे. रशियामधील 13 वर्षाची डारिया (Daria) असा दावा करते की, 10 वर्षांचा इवान (Ivan) तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता आहे.

दोघांच्याही पालकांच्या परवानगीने, एका टीव्ही कार्यक्रमात याचा खुलासा झाला. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की दहा वर्षाचा मुलगा वडील होऊ शकत नाही, ज्यावर डारियाने आपण इतर दुसऱ्या कोणत्याही मुलाशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे म्हटले आहे. हे आश्चर्यकारक प्रकरण सायबेरियामधील आहे. डारिया व इवान एका वर्षापूर्वी भेटले, त्यानंतर त्यांच्यात प्रेम आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असे या मुलीचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दहा वर्षाचा कोणताही मुलगा वडील होऊ शकत नाही. मात्र हे नक्की कसे घडले यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटत आहे.

(हेही वाचा: धक्कादायक! प्रेमप्रकरणातून सहावीची विद्यार्थिनी गर्भवती)

सध्या डारिया दोन महिन्यांची गरोदर आहे. एका कॉमन मित्राद्वारे ती इवानला भेटली. दोघेही पहिल्या क्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही डेट करायला सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यात डारिया गरोदर राहिली. मुख्य म्हणजे या होणाऱ्या मुलाचा पिता आपण स्वतः असल्याचे इवानने सांगितले आहे. हा मुल डारीया आणि तिच्या आईने हे मुल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.