भारतामध्ये दारू विक्रीने सहा वर्षातला उच्चांक गाठला
Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

अनेकदा सेलिब्रेशन्स ही 'मद्यपाना'शिवाय पूर्ण होणं शक्य नाही. आणि भारत आता यामध्ये मूळीच मागे नाही याचा पुरावा आता देण्यात आला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवाडीनुसार मागील सहा वर्षातला उच्चांक देशातील दारू विक्रीने ( Liquor sales)  गाठला आहे. 2012 नंतर यंदा दारू विक्री जोमात झाल्याचं दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दुकानावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याने आया मद्य उत्पादन कंपन्या फायद्यामध्ये आल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र सरकार कडून 1 जानेवारी पासून उत्पादन शुल्कात वाढ; विदेशी मद्य महागणार

व्हिस्की, ब्रँडी, रम आणि व्होडका अशा मद्यांच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. मद्य उत्पादन कंपन्यांसाठी २०१७ हे वर्ष सर्वात वाईट ठरले. यावर्षी दारू विक्रीमध्ये 3% घटली होती. काही नियमांमध्ये शिथलता आल्याने आता मद्य उत्पादन क्षेत्र तेजीमध्ये आलं आहे. 2017 साली सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या लगतच्या दारू विक्रीवर बंधनं घातली होती. परिणामी सुमारे 30,000 दुकानं बंद पडली. बिअर आणि दारूची मागणी कमी झाली पण आता जसे नियम शिथिल झले तशी विक्री पुन्हा वाढली आहे.

परदेशी ब्रॅन्डची दारू आणि रम, व्होडका, व्हिस्की आणि बिअरला पुन्हा मागणी वाढली आहे.