Monsoon 2024 Prediction: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, बहुतेक तापमान मॉडेल्स जुलै-सप्टेंबरच्या आसपास प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे दर्शवत आहेत. ला निनाचा भारतीय नैऋत्य मान्सूनवर सकारात्मक प्रभाव पडतो, त्यामुळे सध्याची ला निनाची स्थिती ही देशासाठी चांगली बातमी असण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते, त्याला ला निना असे संबोधले जाते. आयएमडीने म्हटले आहे की, सध्या पॅसिफिक महासागरात मध्यम ला निना स्थिती आहे आणि आगामी मान्सून हंगामात ती कायम राहण्याची शक्यता आहे. यासह शेतकऱ्यांनी मान्सूनच्या अंदाजावर अवलंबून न राहता आतापासूनच पीक निवड आणि पाणी व्यवस्थापनासाठी धोरण आखावे, असा सल्लाही आयएमडीने दिला आहे. (हेही वाचा: Beggars Free India: आता 2026 पर्यंत अयोध्येसह देशातील 30 शहरे होणार 'भिकारी मुक्त'; सरकार राबवणार पुनर्वसन उपक्रम, जाणून घ्या सविस्तर)
Most models indicate transition to La Nina conditions, considered favourable for Indian southwest monsoon, around July-September: IMD
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2024