Hyderabad: 'हैदराबादच्या Salar Jung Museum मधून वीर सावरकरांचे चित्र हटवले जावे'; कॉंग्रेसची मागणी
Veer Savarkar (Photo Credits: savarkar.org)

विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत काँग्रेसने (Congress) नवा वाद निर्माण केला आहे. हैद्राबादच्या लोकप्रिय सालार जंग संग्रहालयातून (Salar Jung Museum) सावरकरांचे चित्र काढून टाकण्याची मागणी तेलंगणा काँग्रेसने टीआरएस सरकारकडे केली आहे. याप्रकरणी काँग्रेसने हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाही प्रश्न विचारला आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव उस्मान मोहम्मद खान यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी हैदराबादमधील सालार जंग संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयात सावरकरांचे लावण्यावर आक्षेप घेतला आणि ते काढून टाकण्याची मागणी केली. टीआरएस सरकारने ते तातडीने काढून टाकावे, असे ते म्हणाले.

तेलंगणा काँग्रेसच्या नेत्याने हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाही प्रश्न केला आणि ते म्हणाले, ‘संग्रहालय तुमच्या अखत्यारीत येते. येथील स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक एआयएमआयएमचे आहेत. इतकी मोठी गोष्ट घडत आहे आणि याची तुम्हाला जाणीव कशी नाही?’

संग्रहालयात हैदराबादच्या निजामांच्या अतिशय कमी प्रतिनिधित्वावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘आज आम्ही हैदराबादमधील सर्वोत्कृष्ट संग्रहालयात आलो आहोत, परंतु येथील काही दृश्ये पाहून मला खूप वाईट वाटले. निजाम राजवटीच्या पंतप्रधानांच्या काळात सालार जंग घडला होता. येथील निजाम घराण्याने अनेक पुरातन वस्तू दान केल्या होत्या. मात्र, ती सरकारने योग्यरित्या स्वीकारल्या नाहीत.’ (हेही वाचा: Konaseema: आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात आंदोलकांकडून आमदार पोनडा सतीश यांच्या घराला आग)

ते पुढे म्हणाले की, ‘सावरकर हे कधीही स्वातंत्र्य चळवळीचा भाग नव्हते. ते इंग्रजांच्या बाजूने होते. सालार जंग संग्रहालयात त्यांचे चित्र प्रदर्शित केल्याचा आम्ही तीव्र तिरस्कार करतो. दरम्यान, याआधी जानेवारी 2020 मध्ये, काँग्रेस सेवादलाच्या पुस्तकात विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात शारीरिक संबंध होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, भाजप याला काँग्रेसचे कारस्थान म्हणत आहे.