हैदराबाद: प्रेमाला नकार दिल्याने नराधमाने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन जिवंत जाळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी हिंगणघाट मधील एका तरुणीवर भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी सुद्धा एकतर्फी प्रेमातून आरोपीने तिला जीवंत जाळले होते. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता याच घटनेची पुर्नरावृत्ती झाली असून, हैदराबाद येथे प्रेमाला नकार दिल्याने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. तसेच नराधमाने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिला जाळले आहे. यामध्ये सदर पीडित मुलगी 50 टक्के भाजली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात एकटी असताना घरात घुसुन हे कृत्य केले आहे. मुलीने आराडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आरोपी हा 21 वर्षांचा असून त्याने पीडितेला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत काही दिवसांपासून त्रास देत होता. यावर मुलीने माझ्या पाठी लागणे बंद कर असे ही सांगितले होते. तरीही आरोपीने तिचे म्हणणे न ऐकता तोच प्रकार सुरु ठेवला होता. त्यानंतर पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून तो घरात घुसुन तिला घराजवळच्या एका झुडुपांत नेले. तेथे तिच्यावर आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पीडितेचा घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मुलीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपीला तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. (लग्नाला नकार दिल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले; लासलगाव जळीत कांडातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल)

तर काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर परिसरात घडली होती. 19 वर्षीय तरुणीला स्प्रे मारून बेशुद्ध करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. क्रूरतेचा कळस गाठणा-या या नराधमाने पीडित तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.