Indore Airport वर महिला यात्रीच्या समानामध्ये आढळली मानवी कवटी; हरिद्वारला अस्थिविसर्जनासाठी जात असल्याची दिली माहिती
Central Forces | Representational Image (Photo Credit: PTI)

इंदौरच्या (Indore) देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट (Devi Ahilya Bai Holkar Airport) नुकतीच एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एका महिला प्रवासीच्या लगेजमध्ये मानवी खोपडी आणि अस्थी आढळल्याने काही काळ एअरपोर्ट वर खळबळ माजली होती. बॅग स्कॅन करताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर CISF कडून संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, या महिला प्रवासीचं नाव साध्वी योगमाता सचदेवा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे आढळलेल्या अस्थी आणि मानवी खोपडी ही त्यांच्या गुरूची होती. मृत्यूपश्चात विसर्जन हरिद्वारला करण्यासाठी त्या रवाना होत होत्या. मात्र हा प्रकार DGCA च्या नियमावली विरूद्ध असल्याने खोपडी इंदौरलाच ठेवत त्यांना पुढे दिल्लीसाठी जाण्याकरिता रवाना करण्यात आलं. (नक्की वाचा: विमान प्रवासात 4 महिन्याच्या बाळाचा रडण्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून आईने लढवली अनोखी शक्कल; खास संदेशासह दिलं 'हे' गिफ्ट (Photos)).

दरम्यान ही महिला प्रवासी उज्जैनची रहिवासी होती. सकाळी 8.30 चं विस्ताराचं इंदौर-दिल्ली फ्लाईट होतं. प्रवासापूर्वी स्कॅनिंग करताना सिक्युरिटीला काही संशयास्पद गोष्टी आढळल्याने त्यांची पुढील चौकशी झाली. चक्क मानवी खोपडी पाहून सिक्युरिटी स्टाफ देखील हैराण झाला होता. साध्वी महिलेकडून वारंवार तिला खोपडी घेऊन जाण्यास परवानगी मागण्यात येत होती पण नियमांनुसार ही मागणी फेटाळून लावली. केवळ हॅन्डबॅगेमध्ये अस्थी घेऊन जाण्यास एअरपोर्ट करून परवानगी देण्यात आली. मात्र ही प्रक्रिया खूप वेळ चालली. एअरपोर्ट कडून त्यांना रात्रीचं दूसरं तिकीट दिल्यानंतर पुढील प्रवासासाठी साध्वीला परवानगी देण्यात आली.