Human Sacrifice: तमिळनाडू येथे मानवी बळी दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहहे. एका महिलेने आपल्या आजारी नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तिच्या स्वत:च्या सहा महिन्याच्या बाळाचा बळी दिला. या घटनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी 48 वर्षीय महिलेच्या नातेवाईकांना बाळाला पाण्याच्या टबमध्ये बुडवले. महिलेने यासाठी एका जादुगाराची मदत सुद्धा घेतली. तमिळनाडू मधील तंजावुर जिल्ह्ययात मल्लीपट्टीनच्या जवळ झालेल्या अपराधाप्रकरणी महिला, तिचा नवरा आणि जादुगार महिलेसह अन्य तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये ए शर्मिला बेगम, तिचा नवरा अजरुद्दीन आणि दोन मल्लीपटिनम येथील रहिवाशांचा समावेश आहे. तिघांवर नजरुद्दीन आणि एन शाहिला यांची सहा महिन्याची मुलगी हाजारा हिची हत्या करण्यासह पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देत असे सांगण्यात आले की, 15 डिसेंबरला मुलीला पाण्याच्या टबात टाकले. त्यावेळी नातेवाईकांनी याबद्दल पोलिसांना सांगिण्यास टाळले आणि तिचे शव स्थानिक स्मशानात पुरले. मात्र केलेला गुन्हा दीर्घकाळ टिकला नाही आणि त्याचा अखेर खुलासा झालाच. वीएओ थंगमुथु यांनी सेतुवाचतिराम पोलिसांना सतर्क केले.(Punjab Rape Case: पंजाबमध्ये सावत्र बापाचा 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक)
द टाइम्स ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सेतुवाचतिराम पोलिसांनी उच्च अधिकारी आणि राजस्व अधिकाऱ्यांसह अधिक माहिती घेतली. त्यानंतर एक प्रकरण दाखल करत तीन आरोपींच्या अटकेची तक्रार दाखल केली. पोलिसांना चौकशीदरम्यान असे कळले की, मुलीच्या आईची बहिण आणि तिचा नवरा अजरुद्दीन हे काही दिवसांपूर्वीच परदेशातून परतले होते. परंतु जेव्हापासून ते मल्लीपट्टिनम येथे आले तेव्हापासून अजरुद्दीन आजारी होता. शर्मिलाने त्याची प्रकृती बरी व्हावी यासाठी जादूगार सलीम याला संपर्क केला. सलीम याने एक बकरी आणि कोंबड्याचा बळी देण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे केले पण काही झाले नाही. त्यानंतर त्यांनी मुलीला बाथटब मध्ये बुडवून मारले.