Japan Open: HS Prannoy कडून किदंबी श्रीकांत जपान ओपनच्या पहिल्या फेरीतच पराभूत, PV Sindhu कडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा
एचएस प्रणॉय (Photo Credit: BAI Media/ Twitter)

भारताचा अव्वल मानांकित बॅडमिंटन खेळाडू किदंबी श्रीकांत (Kidambi Srikanth) याला जपान ओपनच्या (Japan Open) पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. एचएस प्रणॉय (HS Prannoy) याने श्रीकांतला तीन-गेमच्या लढतीत पराभूत केले. श्रीकांत, माजी विश्व नंबर 1, चालू हंगामात सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत आहे. मागील आठवड्यात इंडोनेशिया ओपनच्या (Indonesia Open) दुसऱ्या फेरीत बाहेर पडल्यामुळे नंबर 10 वर असलेल्या श्रीकांतवर चांगली खेळी करण्याचा दबाव आला होता. 2011 च्या बीडब्ल्यूएफ टूर नंतर पहिल्यांदाच प्रणॉयने श्रीकांतचा पराभव केला आहे.

श्रीकांतने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली पण प्रणॉयने दुसऱ्या गेम 21-11 जिंकत बरोबरी केली आणि खेळाला तिसऱ्या आणि निर्णायक गेमपर्यंत घेऊन गेला. निर्णायक गेममध्ये दोंघांनी एकमेकांनी लढत दिली. शेवटपर्यंत कोण जिंकणार हे सांगणे कठीण होते. प्रणॉयकडे 20-18 अशे दोन मॅच पॉईंटस् होते पण नंतर श्रीकांतने 20-20 अशी बरोबरी साधली. पण प्रणॉयने आपले वर्चस्व बनून ठेवत अखेर सामना जिंकला.

दरम्यान, मंगळ आठवड्यात सुपर 1000 इंडोनेशिया ओपनमध्ये उपविजेती राहिलेली पी. व्ही सिंधू (PV Sindhu) आज जपान ओपनमधील पहिला सामना खेळेल. अश्विनी पोन्नप्पा (Ashwini Ponappa) आणि सिक्की रेड्डी (Sikki Reddy) ही महिला दुहेरीतील जोडी दक्षिण कोरियाच्या किम सो योंग आणि कांग हे योंग विरुद्ध पहिला सामना खेळतील. सिंधूचा सामना चीनच्या हॅन यू हिच्या विरूद्ध होईल. दुसरीकडे, प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी ही भारतीय जोडी पराभूत झाली.