Driving Licence आणि RC Book मिळवा आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये, जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आपल्या मालकीचे वाहन असल्यास त्याबद्दलची सर्व कागदपत्रे असणे आवश्यक असते. तसेच काही वेळेस वाहतुक पोलीस वाहनांची तपासणी करताना वाहनाची कायदेशीर कागपत्रे दाखण्यास सांगतात. मात्र जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसल्यास तुम्हाल दंड भरावा लागतो.

त्यामुळे वाहना संबंधित तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर सी बुक ही महत्वाची कागदपत्रे तुमच्या सोबत असणे फार गरजेचे आहे. परंतु काही वेळेस ही कागदपत्रे आपल्याजवळ ठेवणे जोखमीचे वाटत असल्यास सरकारने 'mParivahan' नावाचे अधिकृत अॅप तुमच्या सेवेसाठी आणले आहे.(1 ऑक्टोबर पासून ड्रायव्हिंग लायसन्स,आरसीबूक नव्या रूपात; मायक्रोचीप क्यूआर कोड मुळे वाहतूक नियम मोडणार्‍यांना बसणार चाप)

या अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने मिळवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये ड्राईव्हिंग लायसन्स आणि आर सी बुक-

- प्रथम 'mParivahaan' हे अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करा.

- त्यानंतर पुढील प्रोसेस करण्यासाठी Sign In ची प्रक्रिया पूर्ण करा.

- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड विचारला जाईल.

- तसेच होमस्क्रिनवर आरसी (RC) या ऑप्शनवर क्लिक करा.

-त्यामध्ये तुमचा गाडी क्रमांक अपडेट केल्यावर तुमच्या गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल.

तसेच ड्रायव्हिंग लायन्ससुद्धा स्मार्टफोनवर मिळवण्यासाठी या अॅपची मदत घेता येणार आहे. मात्र नेहमी तुमच्या सोबत ही महत्वाची कागदपत्रे असल्यास तु्म्हाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.