सरकार ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) मध्ये लवकरच बदल करणार आहे. पुढील पाच महिन्यात म्हणजे 1 ऑक्टोबर 2019 पासून देशभरात लागू होणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) आता एक सारखं दिसणार आहे. देशभरात आता डीएल आणि आरसीचा रंग आणि स्वरूप एकासारखंचं दिसणार आहे. देशामध्ये नियमित 32,000 डीएल लायसन्स दिले जाणार आहेत.
नियमित देशभरात अंदाजे 43,000 गाड्या रजिस्टर आणि री- रजिस्टर होतात. नव्या डीएल आणि आरसी बनवून घेण्यासाठी सुमारे 15-20 रूपये अधिक खर्च होणार आहे.
प्रत्येक राज्य स्वतःच्या सुविधेनुसार डीएल आणि आरसीचा नमुना तयार करतो. त्यामुळे काही राज्य याची माहिती डीएलच्या मुखपृष्ठावर देतात, तर काही जण मागच्या बाजूला माहिती देतात. परंतु आता सर्वच राज्यांमध्ये नव्या नियमानुसार डीएल किंवा आरसी तयार होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एकसंघता येणार आहे.
नव्या स्वरूपातील स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स डीएल आणि आरसीमध्ये मायक्रोचिप आणि क्यु आर कोड दिसणार आहे. त्यामुळे आता ट्राफिकचा नियम उल्लंघन झाल्यास त्याची माहिती मिळणार आहे. ट्राफिक विभागाच्या नव्या नोटिफिकेशनमुळे राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक पीवीसीवर उपलब्ध होणार आहे.