Hindustan Aeronautics Limited चे 20,000 कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर
HAL Logo (Photo credits: HAL)

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) या 55 वर्ष जुन्या कंपनीमध्ये वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये नाशिक येथील ओझरमधील सुमारे 35 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये देशातील 9 विविध ठिकाणी सुमारे 20 हजार कर्मचारी संपावर आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, कोरपूत, लखनऊ आणि नाशिक येथे हिंदुस्थान एरॉनेटिक्स कंपनीचे उत्पादन सुरू असते. तर, देशभरात चार ठिकाणी संशोधन केंद्र आहेत.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी लष्करी साहित्याची निर्मिती केली जाते. नाशिक प्लांटमध्ये SU 30 या विमानांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. सोबतच मिग 21,SU 30 विमानांची देखभाल, दुरूस्ती इत्यादी कामं केली जातात.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कामगार संघटनांच्या वतीने 35% पगारवाढीची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून 8% पगारवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांसमोर ठेवण्यात आल्याने कर्मचारी नाराज असून त्यांनी संपाचा बडगा उचलला आहे. कामगार संघटनांनी कंपनी न कामगारांचे हित लक्षात घेऊन संप मागे घ्यावा असे आवाहन हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाने कामगार संघटनांच्या समन्वय समितीला केले आहे. कामगार संघटनांकडून कंपनी व कामगारांचे हित लक्षात घेता संप मागे घ्यावा याकरिता प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे तसेच याबाबत कामगार संघटनांच्या समन्वय समितीस्गी बोलणी सुरू आहेत.