हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक
रंजित बच्चन (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन (Ranjeet Bachchan)  यांच्यावर 2 फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता अधिक धागेदोरे समोर आले असून रंजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जीतेंद्र याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यापूर्वी दोघांत चकमक झाल्याने पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये आरोपी जीतेंद्र याचा पायाला गोळी लागली असून त्याला लोकबंधु रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच जीतेंद्र याच्याकडून पस्तुल, काडतुसद आणि बाईक जप्त केली आहे.

रंजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी सुद्धा केली. पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपी जीतेंद्र बाईकवरुन रायबरेली येथे पळ काढत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला घेराव घालण्यास प्रयत्न करण्यात आले. मात्र तरीही पोलिसांना पाहता जीतेंद्र याने गोळीबार करण्यात आला. आरोपीच्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी सुद्धा पोलिसांनी गोळीबार केला असता त्याच्या पायाला गोळी लागली.(लखनौ: हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्यावर गोळ्या झाडून हत्या)

 यापूर्वी रंजीत यांची दुसरी पत्नी, तिचा प्रियकर दीपेंद्र आणि हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या पत्नीच बाहेर अफेअर असल्याची गोष्ट रंजीत बच्चन यांना कळली असल्याचे सांगितले जाते. तर 28,29 जानेवारीला आरोपींनी मॉर्निग वॉकला जात रंजीत यांची रेकी केली. त्यानंतर 2 तारखेला रंजित बच्चन यांच्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आली.