Himachal: धक्कादायक! चंबा येथील 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केले क्वारंटाइन
Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

Himachal: कोरोनाच्या महासंकटाच्या विरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. त्याचसोबत दिवसागणिक रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होतेयच. पण विविध ठिकाणाच्या रुग्णालयात रुग्णांचा उपचार घेण्यासाठी बेड्सच नाही आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभुमीवर हिमाचल मधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार चंबा जिल्ह्याजवळी पांगी येथे पाच कोरोनाग्रस्तांना चक्क सुलभ शौचालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.(Coronavirus Vaccination: कोरोनाच्या लसीकरणासाठी CoWin App वर पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटींहून अधिक नागरिकांचे रजिस्ट्रेशन)

पांगीमध्ये कामासाठी आलेल्या काही मजूरांची बस स्थानकात कोरोनाची चाचणी केली गेली. तेव्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले. मात्र या मजूरांसोबत गैरवर्तवणूक करण्यात आली. क्वारंटाइनसाठी या मजूरांना बस डेपोजवळ असलेल्या सुलभ शौचालयात पाठवण्यात आले. या सर्वांना शौचालयात पाठवण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्या बसने मजूर आले होते आणि जेथे त्यांना ठेवण्यात आले तेथे खुप जणांचे येणेजाणे असते. येथे लोक बस पकडत असल्याने प्रादुर्भाव अधिक होऊ शकतो. हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले पाहिजे.(Fact Check: कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णालयातच केली जाते हत्या? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य आले समोर)

या प्रकरणी सीएमओ चंबा डॉक्टर कपिल शर्मा यांनी असे म्हटले आहे की, त्यांच्याकडे सुद्धा याबद्दल माहिती आली आहे. संबंधित क्षेत्रातील बीएमओ यांना कठोर निर्देशन दिले आहेत की, मजूरांना कोविडच्या नियमांनुसार त्यांच्या राहण्याखाण्याची सोय करावी. एसडीएम यांच्या सोबत मिळून या पाच मजूरांना उत्तम जागी क्वारंटाइन केले जाणार आहे. तसेच संबंधित ठेकेदाराच्या विरोधात एफआयआर सुद्धा दाखल केला जाणार आहे.