प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना व्हायरस विषाणूने हाहाकार माजविला असून गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6654 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,25,101 वर पोहोचली आहे. तर मागील 24 तासांत 137 रुग्ण दगावले असून देशात मृतांचा एकूण आकडा 3720 वर पोहोचला आहे. सद्य स्थिती देशात 69,597 रुग्णांवर उपचार सुरु असून 51,784 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असली तरीही रुग्ण बरे झाल्याची संख्याही वाढत आहे. ही बातमी समाधानकारक असून लवकरच ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून या राज्यात 44,582 रुग्ण आढळले आहे. तर एकूण 1517 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू, गुजरात, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.  Coronavirus in India: देशात 5 राज्यांत सुमारे 80 टक्के कोरोना व्हायरस प्रकरणे; Doubling Rate झाला 13.3 दिवस, Recovery Rate 40 टक्क्यांपेक्षा जास्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड-19 चे 3,234 रुग्ण गेल्या 24 तासांत बरे झाले आहेत व ही समाधानकारक बाब आहे. एम्पॉवर्ड ग्रुप 1 चे अध्यक्ष डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, 'आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 19 तारखेला 1 कोटी उपचार पूर्ण झाले.

दरम्यान काल (22 मे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (Indian Broadcasting Foundation) यांच्यासोबत एक बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकार सर्वोतोपरी काळजी घेत टीव्ही उत्पानद सुरु करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत फिल्मसिटीमध्ये पुन्हा शुटिंग सुरु करता येईल का याचा सुद्धा सरकारकडून विचार करण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.