राजकारण अथवा राजकीय कारणांसाठी मंदिरे वापरता येणार नाहीत, असे स्पष्ट मत नोंदवत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court ) मंदिरांत भगवे झेंडे (Saffron Flags लावण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. जी कोल्लम जिल्ह्यातील पोरुवाझी येथील दोन रहिवाशांनी दाखल केली होती. पोलीस संरक्षणात हे झेंडे मंदिरात उभारले जावेत अशी या दोघांची याचिकेद्वारी मागणी होती. मंदिरे ही अध्यात्मिक आणि शांततेचा संदेश देणारी पवित्र प्रेरणास्थळे आहेत. या ठिकाणी लोकांच्या भावना आणि त्यांच्या श्रद्धा महत्वाच्या असतात. त्यामुळे त्याचा वापरही तितकाच आदराने झाला पाहिजे. परिणामी राजकारणासाठी त्याचा वापर केला जाऊ नये. ज्यामुळे त्याचे पावित्र्य, श्रद्धा आणि भावनांना धक्का लागेल, असे मत याचिका फेटाळताना न्यायमूर्ती राजा विजयरघवन यांनी 5 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशात सांगितले.
याचिकाकर्त्यांनी मुथुपिलाक्काडू श्री पार्थसारथी मंदिराचे भक्त म्हणून केरळ कोर्टात आपले म्हणने सांगितले. त्यांच्या याचिकेत त्यांनी म्हटले होते की, त्यांना मंदिर आणि त्याच्या योग्य प्रशासनाच्या कल्याणात रस आहे. त्यामुळे त्यांनी सन 2022 मध्ये भक्तांच्या कल्याणाच्या उद्देशाने “पार्थसारथी बकथजानसमीथी” या नावाने एक संघटना स्थापन केली आहे. याचिकाकर्त्यांनी असा दावा केला की जेव्हा त्यांनी आणि त्यांच्या संघटनेने विशेष प्रसंगी मंदिराच्या आवारात भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही लोकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे आपण कोर्टाकडे धाव घेतली असून आपल्याला पोलीस संरक्षणात मंदिरात भगवे झेंडे लावण्यास आणि विधी शांततेत करण्यास परवागी मिळावी. कोर्टाने आपल्या आदेशात कोल्लम जिल्हा पोलिस प्रमुख आणि सस्थामकोटा स्टेशन हाऊस ऑफिसर यांना निर्देश द्यावेत अशी याचिकाकर्त्यांची इच्छा होती.
ट्विट
Kerala High Court rejects plea to erect saffron flags at temple, says temples cannot be used for politics
Read more here: https://t.co/WK5gp6OnV0 pic.twitter.com/XvCKOlSwJ7
— Bar & Bench (@barandbench) September 14, 2023
दरम्यान, याचिकेला उत्तर देताना सरकारच्या वकिलांनी असे निदर्शनास आणून दिले की याचिकाकर्त्यांना मंदिरातील विधी करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित झेंडे आणि फलकांसह मंदिर सजवण्याची परवानगी देण्याच्या याचिकेवर सरकारने असा युक्तिवाद केला की “मंदिराला राजकीय रणांगण म्हणून वापरण्याची परवानगी देणे मंदिर आणि समाजातील शांतता आणि पवित्रता नष्ट करेल.