Pramod Patil, Raj Thackeray (Photo Credits: Facebook)

आज राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. काही ठिकाणी अद्यापही मतमोजणी सुरु आहे तर काही ठिकाणी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अद्याप एकाच सीट मिळाली आहे आणि ती म्हणजे कल्याण ग्रामीण या मतदारसंघाची.

प्रमोद पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पराभूत करत विजय मिळवला आहे.

तर जाणून घेऊया मनसेचे एकमेव विजेते प्रमोद पाटील नक्की कोण आहेत?

प्रमोद पाटील यांना राजू पाटील या नावाने ओळखले जाते. पदवीधर शिक्षण घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. त्यांचे स्वतःचे काही व्यवसायही आहेत आणि त्यांच्या नावे असलेली एकूण संपत्ती 22.21 कोटी इतकी आहे. त्यातील 3.43 कोटींची त्यांच्या नावे जंगम संपत्ती आहे तर १८. ७७ कोटींची स्थावर संपत्ती आहे.

त्यांच्या नावावर असलेल्या गाड्या म्हणजे लॅण्ड क्रूझर, होंडा सिटी, हायवा टिपर. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत इनोव्हा व फोर्ड गाड्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates:

विशेष म्हणजे प्रमोद यांच्यावर आजवर एकही गुन्हा दाखल नाही. आणि ते माजी आमदार रमेश पाटील यांचे लहान बंधू आहेत.