
Kedarnath Helicopter Crash: उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) धाममध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crash) घटना घडली आहे. आपत्कालीन लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटून खाली पडला. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्व तीन प्रवासी, एक डॉक्टर, एक कॅप्टन आणि एक वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत. अपघाताची चौकशी सुरू आहे.
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड -
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवर उतरत असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटला. हेलिकॉप्टर खाली पडताना पाहून प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. जवळपास उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली, पण पायलटने हुशारी दाखवली आणि हेलिकॉप्टर उतरवले. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे होते. त्यात प्रवास करणारे तीन डॉक्टर एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथ धामला जात होते. रुग्णाला केदारनाथ धाम येथून एम्स ऋषिकेश येथे हलवावे लागले. लँडिंगच्या अगदी आधी, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु लँडिंग करताना हा अपघात झाला. (हेही वाचा - Uttarakhand Helicopter Crash: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू)
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात -
केदारनाथ में बड़ा हादसा होने से बचा,
दो चिकित्सकों को केदारनाथ ले जा रहा हेलीकॉप्टर क्रैश होते बचा,एयर एम्बुलेंस में तकनीकी खराबी आने से इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी, यह एयर एम्बुलेंस AIIMS ऋषिकेश की है pic.twitter.com/kSRjWDMgax
— Abhishek Dwivedi /अभिषेक द्विवेदी 🇮🇳 (@Dubeyjilive) May 17, 2025
उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले -
दरम्यान, 8 मे रोजी उत्तराखंडमध्येही एक हेलिकॉप्टर अपघात झाला होता. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानी येथे झालेल्या अपघातात 6 जणांना जीव गमवावा लागला होता. पोलिस अधीक्षक सरिता डोबल यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मुंबई आणि आंध्र प्रदेशातील होते. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 जण गंगोत्री धामला जात होते. त्यात मुंबईचे ४ आणि आंध्र प्रदेशचे 2 प्रवासी होते. तथापि, पायलट रॉबिन सिंग यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.