कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. कोल्हापूरात कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये 11,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गुरुवारपासून कोकण, पुणे, कोल्हापूर परिसरात जोर वाढण्याची शक्यता)
पाहा व्हिडिओ -
🛑Kolhapur Rain Update
▶️आज (दि.३१) राधानगरी धरणाची सातही दरवाजे उघडली
▶️सात दरवाजामधून 10000 cusec
▶️विद्युतगृह विसर्ग- 1500 क्युसेक्स एकूण - 11500 क्युसेक्स#rainupdate #radhangaridam @kolhapur pic.twitter.com/Avl9omT6em
— Sonali Minakshi Dadaso (@SonaliJ09227190) July 31, 2024
राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्यामुळे आता भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तुळशी धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकाचे मोठे नुकसान झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मात्र पूरस्थिती कायम आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग होत नसल्याने शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. या तालुक्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या पुरग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.