HDFC (Photo Credit: PTI)

कर्ज देणाऱ्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) रविवारी सांगितले की, ग्रामीण भागात त्याची पोहोच दुप्पट करून ती दोन लाख गावांपर्यंत पोहोचवली जाईल. यासाठी बँकेने पुढील सहा महिन्यांत 2,500 लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 18-24 महिन्यांत शाखा नेटवर्क, व्यवसाय प्रतिनिधी, कॉमन सर्व्हिस सेंटर, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागात आपली उपस्थिती दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे. तत्पूर्वी रविवारीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले.

एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे जिचे मुख्यालय मुंबईत आहे. आता HDFC चा हा निर्णय अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर समोर आला आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा नेटवर्क विस्तार झाल्यानंतर एक तृतीयांश ग्रामीण भागात त्यांची उपस्थिती वाढेल. यामुळे प्रत्येक व्यक्तीला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होईल आणि लोक जास्तीत जास्त बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. (हेही वाचा: Bharat Bandh: शेतकरी संघटनांची उद्या देशव्यापी 'भारत बंद'ची हाक; जाणून घ्या काय सुरु राहणार व काय बंद)

एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी सांगितले की, क्रेडिट आणि कर्जाच्या बाबतीत, देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर विविध सेवांपासून दूर आहे. मात्र, बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात.

राहुल शुक्ला यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, एचडीएफसीचे स्वप्न देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये आपली सेवा पुरवणे आहे. ही बँक सध्या देशातील 550 जिल्ह्यांमध्ये त्याच्या उत्पादनांचा आणि सेवांचा लाभ देत आहे. एचडीएफसी बँक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त बँकिंग सेवा पुरवते. देशाच्या इतर भागात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी या बँकेने 2500 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने अद्याप याबाबत कोणतीही योजना जारी केलेली नाही.