Hathras sCase (Photo Credits-ANI)

Hathras Case: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील सरकारवरुन सुद्धा चहूबाजूंनी सडकून टिका केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता पीडितेचा भाऊ याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाशीधांच्या अंतर्गत चौकशी केली जावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.(Uttar Pradesh: अलीगढ येथे 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु)

पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह परिवाराल दिला गेला नाही. त्यामुळे परिवाराला तिला शेवटचे पाहता ही आले नसून पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप लावण्यात येत आहे. अंत्यसंस्कारानंतर पीडितेला बघणे तर दूर पण भावाने तिच्या अस्थी जमा करताना त्याल अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले. तसेच जो पर्यंत तिला न्याय दिला जात नाही तो पर्यंत तिच्या अस्थी विसर्जन करणार नसल्याचे ही त्याने स्पष्ट केले आहे.(Hathras Gangrape Case: हाथरस प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आदेश)

दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जर काहीच केले नाही तर मीडियाला का अडवले जात आहे असा सवाल सुद्धा उपस्थितीत करण्यात आला होता. त्यानंतर आता सर्वत्र बाजूने टिका केल्यानंतर अखेर पीडितेच्या परिवाराल भेटण्यासह मीडियाला तेथे जाऊ दिले जात आहे. तसेच पीडितेला न्याय देण्यासाठी दिल्ली गँगरेप मधील पीडितेच्या वकिल या आता हाथरस मधील पीडितेला न्याय मिळवून देणार असल्याचे बोलले जात आहे.