Manohar Lal Khattar | (File Photo)

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Chief Minister Manohar Lal Khattar) यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारला (Haryana Government) ‘गोरख धंधा’ (Gorakh Dhanda) शब्दाचे वावडे आले आहे. हरियाणा (Haryana) सरकारने ‘गोरख धंधा’ शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. हा शब्द प्रामुख्याने अनैतिक कृत्याचे वर्ण करण्याबद्दल उच्चारला जातो. हरियाणा सरकारने बुधवारी (18 ऑगस्ट) अधिकृतपणे एक पत्रक जाहीर करत म्हटले की, गोरखनाथ समुदायाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली. त्यानंतर खट्टर सरकारने हा निर्णय घेतला.

गोरखनाथ समुदायाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन अग्रह केला की, ‘गोरख धंधा’ शब्दाच्या वापरावर निर्बंध लावावेत. हा शब्द प्रामुख्याने अनैतिक कृत्याचे वर्ण करण्याबद्दल उच्चारला जातो. त्यामुळे गोरखनाथ समुदायाच्या भावना दुखावल्या जातात. त्यानंतर खट्टर यांनी या शब्दांच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री गोरखनाथ यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, गोरखनाथ हे एक संत होते. त्यामुळे चुकीच्या अर्थासाठी त्यांचा नामोल्लेख असलेला शब्द वापरणे हे अनुयायांच्या भावना दुखवाल्याप्रमाणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हरियाना सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ‘गोरख धंधा’ शब्दाच्या वापरास पूर्णपणे बंदी घातली आहे. गोरखनाथ हे एक संत होते आणि त्यांना समर्पीत एक मंदिर सोनीपत येथून 20 किलोमीटर दूर असलेल्या गोर्ड गावात आहे.