Himachal Pradesh: 102 मतदारांचा एकच पत्ता; मतदार यादीतील मोठा गोंधळ उघडकीस
Voter List | Representational Image | (Photo Credits-Facebook)

मतदार यादीतील घोळ काही नवे नाहीत. साधारणपणे निवडणूका जवळ आल्यावर मतदार यादीतील गोंधळ समोर येऊ लागतात. दरम्यान, हिमाचल प्रदेश (Himachal Peadesh) मधील ऊना (Una) जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील (Haroli Assembly Constituency) नगरपंचायत टाहलीवाल मधील एक मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. येथील मतदार यातील एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र असल्याचे निर्दशनास आले आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी ट्विट करत ही बाब उघडकीस आणली आहे.

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "ताहिवालमध्ये एकाच घर आणि पत्त्यावर 102 मतदार केले गेले, ज्यात बहुतांश स्थलांतरित होते. हा आहे मतांचा अवैध धंदा. तसंच त्यांनी या ट्विटमध्ये मतदार यादीचे काही फोटोजही जोडले आहेत."

मुकेश अग्निहोत्री पोस्ट:

या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून मतदार यादीच्या विश्वासर्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप मुकेश अग्निहोत्री यांनी केला आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने यावर मौन पाळून आहे. दरम्यान, या प्रकरणाची कोणतीही कल्पना नसून तक्रार केल्यास कारावी केली जाईल, असे हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी गौरव चौधरी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एका हिंदी वेबसाईटच्या माहितीनुसार, हरोली मधील एकमेव नगरपंचायत टाहलीवालमध्ये काँग्रेसला परावभ पत्करावा लागला. येथे भाजपला बहुमत मिळाले आहे.