आज दलाई लामांचा (Dalai Lama) 87 वा वाढदिवस आहे. दलाई लामा 6 दशकांपासून भारतात राहत आहेत आणि स्वत: ला भारताचा पुत्र मानतात. ते त्यांचा वाढदिवस दरवर्षी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) धर्मशाला येथील तिबेटी समुदायाबरोबर साजरा करतात. लामांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मॅकलॉडगंज धर्मशाळेत त्सुगलगखांग येथे महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेले दोन वर्ष कोविडमुळे महोत्सव झाला नाही. म्हणूनच यावर्षी दलाई लामांचा वाढदिवस जय्यत तयारीसह पार पडणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) खुद्द फोन करत दलाई लामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना सुखी आणि निरोगी आरोग्य लाभो असं ट्वीट (Tweet) करत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गेल्या वर्षी एलएसी (LAC) वरील लष्करी अडथळ्यावरून चीनशी संबंधांबाबत पंतप्रधान मोदींनी दलाई लामांबरोबर चर्चा केली होती. दस्तुरखुद्द देशाच्या पंतप्रधानांनी फोन कॉल करत शुभेच्छा देत सलग दोन वर्षे त्याची जाहीर घोषणा करणे, याला आंतरराष्ट्रय स्तरावर मोदींची कुटनीती म्हणूनही उल्लेख केल्या जातो.
Conveyed 87th birthday greetings to His Holiness the @DalaiLama over phone earlier today. We pray for his long life and good health.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022
चीनच्या (China) परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यानंतर चीनकडून संबंध जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु, सीमावाद सोडवल्याशिवाय नीट होवू शकणार नाहीत, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. गेल्या दोन वर्षापासून पंतप्रधान दलाई लांमांना वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा देतात. तसेच केंद्रीय तिबेट प्रशासन, केंद्रीय सरकाराचे निर्वासित अधिकारी, हिमाचल प्रदेश सरकारचे अधिकारी, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि विविध नामांकित जागतिक व्यक्ती लामांच्या वाढदिवसाला हजेरी लावतात.