गुरूग्राम (Gurugram) मध्ये सेक्टर 109 मध्ये काल संध्याकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. घराचं छत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण ढिगार्याखाली अडकले आहेत. सध्या त्यांच्या बचावाचं काम सुरू आहे. एका रहिवासी सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर छप्पर कोसळल्याने हा अनर्थ घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार Chintels Paradiso ही 18 मजली इमारत आहे. सातव्या मजल्यावर मालक डागडुजीचं काम करत होता. दरम्यान फक्त पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर लोकं राहत होती असे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली.
#WATCH | Haryana: Visuals from Chintels Paradiso housing complex in Gurugram's Sector 109 where a portion of the roof of an apartment has collapsed.
Details awaited. pic.twitter.com/WI22vLwOy6
— ANI (@ANI) February 10, 2022
छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये पहिल्या मजल्या वरील 2 लोकं मातीच्या ढिगार्याखाली अडकले आहेत तर दुसर्या मजल्यावर राहणार्या महिलेचा मृतदेह हाती आला आहे. इतर रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील या घटनेवर आपण स्वतः जातीने लक्ष देऊन असल्याचं म्हटलं आहे. काल त्यांनी ट्वीट करत SDRF आणि NDRF टीम बचावकार्य करत असल्याचं म्हणाले आहेत.