काँग्रेस (Congress) नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची भाषा काहीशी बदलली आहे. त्यांनी पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसवर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला आहे. हार्दिक पटेल यांनी सूचक वक्तव्य करत करत काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. पटेल यांनी गुजरात काँग्रेस (Gujarat Congress) नेतृत्वावर जोरदार टीका करत म्हटले आहे की, पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. ते पाठीमागील तीन वर्षांपासून पक्षाकडे सातत्याने तक्रार करत आले आहेत. आता गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Election 2022) तोंडावर आल्या असताना त्यांनी भाजपबद्दल कौतुगोद्गार काढले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप पक्षात काही गोष्टी जरुर चांगल्या आहेत, असे उद्गार हार्दिक यांनी काढले आहेत.
प्रसारमाध्यमांनी अधिक जोर देऊन विचारले असता हार्दिक पटेल यांनी तितकाच जोर देत म्हटले आहे की, ते कोणत्याही प्रकारे भाजपच्या संपर्कात नाहीत. परंतू, भाजपमध्ये खरोखरच काही गोष्टी चांगल्या आहेत. ज्याचा आम्ही स्वीकार करायला आहे. हार्दिक पटेल यांनी एकेकाळी भाजप सरकारविरुद्ध पटेल आरक्षणावरुन जोरदार आंदोलन पुकारले होते.
हार्दिक पटेल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, भाजपमध्ये नुकतेच काही राजकीय निर्णय घेतले गेले. आम्हाला हे स्वीकारावे लागेल की, त्यांच्याकडे अशी काही पवले उचलण्याची क्षमता आहे. त्यांच्या पक्षाचे कौतुक करत किंवा न करताही आम्हाला त्यांच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जर गुजरात काँग्रेसला अधिक भक्कम बनवायचे असेल तर आम्हाला निर्णय घेण्याचे कौशल्या अधिक विकसीत करायला हवे. तसेच, निर्णय घेण्याची तयारीही दर्शवावी लागेल. (हेही वाचा, Hardik Patel: 'नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी पक्षात माझी अवस्था', हार्दिक पटेल काँग्रेसवर नाराज)
Ahmedabad, Gujarat | I've no plans to join BJP. I welcome the political decisions that have been taken by BJP recently. The party is strong in Gujarat as they have leadership with decision-making abilities... I hope the high command will listen to me: Congress leader Hardik Patel pic.twitter.com/DdcRBgb4nY
— ANI (@ANI) April 22, 2022
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे की ते काँग्रेस सोडण्याच्या विचारात नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था अशी झाली आहे की, जसे एखाद्या नव्या नवरदेवाची नसबंदी केली आहे. हार्दिक पटेल यांनी 2015 मध्ये पटेल आरक्षणावरुन भाजप सरकार विरोधात जोरदार आंदोलन सुरु केले होते. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु करताच त्यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते आहे.