File image of Gujarat CM Vijay Rupani | (Photo Credits: PTI)

गुजरातचे (Gujrat)  मुख्यमंत्री विजय रूपानी (CM Vijay Rupani)  हे कोरोनाची लागण (Corona Positive) झालेल्या एका काँग्रेस आमदाराच्या संपर्कात आले होते. त्यानंतर रुपानी यांची सुद्धा कोरोना चाचणी घेण्यात आली मात्र यात त्यांना कोणतेही कोरोनाचे लक्षण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही एकीकडे दिलासादायक बातमी असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येऊन स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याची गरज नाही असा दावा रूपानी यांनी केला आहे. त्याऐवजी येत्या एका आठवड्यासाठी ते कोणालाही भेटणार नाहीत व त्यांच्या निवासस्थानी कोणालाही प्रवेश नसेल असे सांगण्यात आले आहे. याबाबत पीटीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. गुजरात: काँग्रेस आमदार इमरान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी 14 एप्रिल रोजी रुपानी यांनी आमदारांच्या सह गांधीनगर येथील निवासस्थानी बैठक घेतली होती. यावरी अन्यही अनेक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर या आमदाराची कोरोना चाचणीचे रिपोर्ट आले दुर्दैवाने हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि गुजरात मध्ये यावरून खळबळ माजली.

रुपानी यांच्या माहितीनुसार, बैठकीच्या दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले होते त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. संबंधित कोरोना रुग्ण आमदार हे रुपानी यांच्यापासून 8 मीटर दूर बसले होते. कोणीही काळजी करण्याची गरज नाही आपण योग्य काळजी घेत आहोत असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

पीटीआय ट्विट

दरम्यान, गुजरात मध्ये कोरोनाचे 650 रुग्ण आहेत आणि 28 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, ताज्या माहितीनुसार, 11,439 रुग्णांमध्ये 9756 रुग्ण सक्रिय केसेस असून 1306 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.