गुजरातमधील(Gujrat)अहमदाबाद(Ahmedabad) येथे डान्स शो पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी लुटणारी गुजराती अभिनेत्री(Gujrati Actress) अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तसेच या अभिनेत्रीने आजवर अनेक प्रेक्षकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचा दावा पीडित प्रेक्षकांकडून केला जात आहे.
संजना बॅनर्जी उर्फ संजू( Sanjana Banerjee) असे या गुजराती अभिनेत्रीचे नाव आहे. संजना ही गुजरातमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'जानू मारी दगाबाज आणि वन्स मोर बेफवा' या गाण्यांच्या अल्बमधून झळकली आहे. या गाण्याच्या अल्बनंतर तिला गुजरातमध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला एक ही काम मिळाले नाही. तर या संजूचा पती ही बेरोजगार होता. त्यामुळे पोटापाण्याचा सांभाळ करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था कशी करायची याची चिंता तिला सतावत होती. म्हणून संजूने तिचा मित्र सय्यद मोईन याच्या सोबत ठिकठिकाणी डान्स शो(Dance Show) करण्यास सुरुवात केली. मात्र लोकप्रियता मिळाल्याने शेफारलेल्या संजूने त्या प्रसिद्धीचा गैरवापर करत प्रेक्षकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
संजनाला प्रत्यक्षात स्टेजवर लाईव्ह परफॉन्स करताना पाहायला मिळणार या आशेने अनेक प्रेक्षक तिच्या डान्स शोसाठी गर्दी करायचे. मात्र संजू या संधीचा फायदा घेत प्रेक्षकांसोबत अंगलट करुन सय्यदला तिचे फोटो काढण्यास सांगायची. नंतर हेच फोटो दाखवून हे दोघे पीडित प्रेक्षकांना धमकावून ब्लॅकमेल करत होते. या प्रकरणी पोलिसांत पीडित प्रेक्षकांनी गुन्हा ही दाखल केला होता. मात्र काही काळ संजू ही पोलिसांपासून बचाव करण्यासाठी गायब झाली होती. शेवटी पोलिसांनी आरोपी संजूचा शोध काढून अटक केली आहे.