Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गुजरात (Gujarat) राज्यातील कच्छ येथे एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात नर्मदा कालव्यात (Narmada Canal) एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. सदर घटना प्रागपूर पोलीस स्टेशन (Paragpur police Station) हद्दीतील गुंडला गावातील आहे. तासभर चाललेल्या बचावकार्यानंतर पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात सन्नाटा पसरला आहे. एकाच कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या संख्येने पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी एकाच कुटुंबातील पाच प्रयत्न करत होते. ही महिला नर्मदा कालव्यात बुडत होती. मदत करुन तिचे प्राण वाचविण्यासाठी एकाच कुटुंबतील पाच जणांनी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, कालव्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पाणी काढत असताना महिला कालव्यात पडल्याचे एसपींनी सांगितले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. (हेही वाचा, Amravati Boat Capsize Incident: वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 4 मृतदेह हाती)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यात घसरलेल्या महिलेला वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांनी कालव्यात उडी घेतली. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका 15 वर्षीय मुलीचा समावेश आहे. सदर महिला पाणी आणण्यासाठी गेली असता ती घसरली आणि कालव्यात पडली.