IAF | X

भारताकडून दोन एअर फोर्स पायलट्सची Axiom-4 mission या International Space Station च्या ट्रीपच्या ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली आहे. Group Captain Shubhanshu Shukla हे Prime Astronaut तर Group Captain Prasanth Balakrishnan Nair हे त्यांचे बॅकअप म्हणून निवडले गेले आहेत. Indian Space Research Organisation अर्थात इस्त्रो कडून ही माहिती देण्यात आली आहे.

Indian Air Force ने देखील 'आकाशाला गवसणी घातल्यानंतर आता IAF अवकाशामध्ये भरारी घेण्यास सज्ज' अशी पोस्ट X वर केली आहे. Group Captain Shukla यांना 2000 तासांचा फ्लाईंग अनुभव आहे. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, आणि MiG-29 देखील चालवली आहेत. Prasanth Balakrishnan Nair यांचा देखील 3,000 तास उड्डाणाचा वेळ नोंदवला आहे. दोन एअर फोर्स पायलट्सना ISS वर पाठवण्यासाठी इस्रोने Axiom Space सोबत अंतराळ उड्डाण करार केला. स्पेस एजन्सीच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरने शुक्ला यांची मुख्य मिशन पायलट म्हणून शिफारस केली होती. National Space Day 2024: यंदा 23 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या पहिल्या 'राष्ट्रीय अंतराळ दिना'च्या समारंभासाठी ISRO सज्ज; विद्यार्थ्यांसाठी खास Hackathon चे आयोजन .

Axiom-4 मिशन हे ISS मधील चौथे खाजगी अंतराळवीर मिशन आहे. नियुक्त केलेल्या क्रू सदस्यांना Multilateral Crew Operations Panel द्वारे ISS वर उड्डाण करण्यास मान्यता दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या भेटीदरम्यान भारतीय अंतराळवीरांची ISS ला भेट देण्याची योजना जाहीर केल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळानंतर हे मिशन आले आहे.