LPG Cylinder | (Photo Credits: Latestly)

LPG subsidy hiked: घरगुती एलपीजी गॅसवरील जोडणी घेणाऱ्या महिलांना देण्यात येणारे अनुदान केंद्र सरकारने 200 रुपयांवर 300 रुपये केले आहे. अनुदान प्रति सिलिंडर असणार आहे. तसेच, उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना हा लाभ घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या प्रति 14.2 किलो गॅससाठी 703 रुपये मोजतात. बाजारात हाच गॅस 903 रुपयांना भेटतो. केंद्राच्या नव्या घोषणेमुळे तो आता 603 रुपयांना भेटू शकतो.

सप्टेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) च्या विस्तारास मंजुरी दिली होती. ज्यामुळे 75 लाख गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यासाठी तीन वर्षांमध्ये 1,650 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मे 2016 मध्ये पीएमयूवाय (PMUY) ही प्रमुख योजना सुरु केली. ज्यामध्ये एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन, ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. देशातील बहुतांश महिला सरपण, कोळसा आणि यांसारख्या पारंपारिक पद्धतीचे स्वयंपाक इंधन वापरत होत्या. पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही होणारा घातक परिणाम रोखण्यासाठी ही योजना कार्यन्वित करण्यात आली होती.

ट्विट

वाचकांच्या माहितीसाठी असे की, PMUY कनेक्शनसाठी रोख सहाय्य भारत सरकारद्वारे प्रदान केले जाते. तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) सर्व PMUY लाभार्थींना प्रथम LPG रिफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जाते.